नदीपात्रात बॅगमध्ये आढळला मृतदेह !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुणे – वारजे माळवाडी परिसरातील नदीपात्रात एका बॅगमध्ये तरुणाचा खून झालेल्या अवस्थेतील मृतदेह गुरुवारी सापडल्याने खळबळ उडाली आहे.

 

मृत तरुण ३५ वर्षाचा असून त्याची ओळख पटली नसल्याने पाेलिसांनी सांगितले. वारजे माळवाडी येथे स्मशान भूमी जवळील पुलाखाली नदीपात्रात फिरणाऱ्या काही तरुणांना एक बेवारस बॅग गुरुवारी दुपारी आढळली.

 

या बॅगमधून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी याबाबत पाेलिसांना माहिती दिली. त्यानुसार पाेलिस घटनास्थळी दाखल झाले.

 

त्यांनी बॅग उघडून पाहिली असता त्यात एका तरुणाचा मृतदेह आढळला. तरुणाचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आराेपींनी मृतदेह बॅगमध्ये भरून ताे पुलावरून खाली नदीपात्रात फेकून दिल्याचा अंदाज पाेलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचो पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment