आमदार-खासदार असतानाही दादापाटील शेळके यांचा साधेपणा कधी हरवला नाही !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :-दादापाटील शेळके हे दोन वेळेस लोकसभेत व चार वेळेस विधानसभेत निवडून गेले होते. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ व नगर विधानसभा मतदारसंघात त्यांचे अनेक दशके वर्चस्व राहिले. 

त्यांच्यावर नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.उपचार सुरू असताना आज रात्री त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनामुळे नगर तालुक्यावर मोठी शोककळा पसरली.

दादा पाटील शेळके यांनी नगर तालुका सहकारी साखर कारखाना उभारणीत मोठे योगदान दिले. तसेच कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष होते.

नगर पंचायत समिती सभापती जि.प. सदस्य असा पदापासुन सुरूवात करत त्यांनी खासदारकीपर्यत मजल मारली. राजकारणात असुनही साधी राहणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अ

‘साधी राहणी उच्च विचार’ या सुविचारला साजेसं व्यक्तिमत्व असलेले दादा पाटील दोन वेळा खासदार, 1978 ते 1994 या दरम्यान चार वेळा आमदार होते.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, निलंगेकर, शरद पवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. नगर सारख्या दुष्काळी तालुक्यात त्यांनी सहकारी साखर कारखाना स्थापन केला.

त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे सदस्य, नगर तालुका पंचायत समितीचे उपसभापती, जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र रोजगार हमी योजना समितीचे सदस्य,

नगर तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष, नगर तालुका दूध संघाचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य, नगर तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भुषविली.

सामान्य शेतकऱ्यांप्रमाणे त्यांचा पेहराव असायचा. आमदार-खासदार असतानाही त्यांच्यातील साधेपणा कधी हरवला नाही. राजकारणात कितीही अडचणी आल्या तरी त्यांनी विचारधारेशी प्रतारणा करून कधी पक्षांतर केले नाही.

पुलोदच्या प्रयोगावेळी वसंतदादांचे सरकार गेले; तेव्हा मंत्रिपदाची ऑफर धुडकावून त्यांनी वसंतदादांबरोबर राहणे पसंत केले होते. ही निष्ठा आजच्या राजकारणात दुर्मिळ आहे.

Leave a Comment