मोबाइल नंबर घेऊन धमकी देत क्लेरा ब्रूस मैदानाजवळ तरुणीवर गाडीत बलात्कार!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
अहमदनगर :  बाहेरगावाहून नोकरीनिमित्त शहरात खासगी वाहनाने येणाऱ्या तरुणीवर वाहनचालकाने गाडीतच अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
ही घटना स्टेशनरोडवर क्लेरा ब्रूस मैदानाजवळ मंगळवारी (१९ नोव्हेंबर) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. टाकळी काझी परिसरातील एक युवती नगरमध्ये नोकरीकरिता खासगी वाहनाने चार महिन्यांपासून येते. मंगळवारी तिला रात्रीची ड्युटी होती. त्यावेळी नगरला येत असताना हा प्रकार घडला.
जामखेडहून नगरकडे येणाऱ्या वाहनाला तिने हात करून थांबवले व तुम्ही नगरला जात आहात का असे विचारले. त्यावर चालकाने तुम्हाला नगरला सोडतो, असे सांगितले.
गाडीमध्ये चालकाशिवाय अन्य कोणीही नव्हते. रस्त्याने येताना वाहनचालकाने तरुणीशी बोलून तिची जुजबी माहिती घेतली व तो स्वत: एमआयडीसीत राहात असल्याचे सांगितले.
ते स्टेशनरोडवरील पाटील हॉस्पिटलजवळ आले असता त्याने गाडी क्लेरा ब्रूस मैदानाजवळ रस्त्याच्या कडेला उभी केली.
अचानक गाडीचे सर्व दरवाजे व काचा लावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. तरुणीने आरडा-ओरडा केला परंतु हायवेवरच्या गाड्यांचा मोठा आवाज असल्याने तिचा आवाज कोणालाही ऐकू गेला नाही. त्यानंतर त्याने तिचा मोबाइल नंबर घेऊन धमकी दिली.
या घटनेबाबत सदर तरुणीने आईला सांगितले. त्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. पोलिसांनी अनोळखी वाहनचालकाविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

Leave a Comment