Lifestyle

राशीभविष्य : या राशीच्या लोकांना हा आठवडा जाणार जबरदस्त !

मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य…

मेष :- मित्र-मैत्रिणींसमवेत एखादी छोटी सहल आयोजित कराल. त्यामुळे कामातील ताणतणाव तितकेसे जाणवणार नाहीत. उद्योगधंद्यात अचानक मोठे खर्च उद्भवू शकतात. खर्चाचे पत्रक गृहलक्ष्मीच्या हाती सोपवा.राजकारणापासून सुरक्षित अंतर ठेवा. विरोधकांना मात द्याल. 

वृषभ :- नशिबाची उत्तम साथ या आठवडय़ात लाभणार आहे. जे नवीन काम हाती घ्याल त्यात यश मिळेल. नव्या ओळखीतून नवा मित्रपरिवार जोडला जाईल. भगवान श्री गणेशाची पूजा करा. कामा-धंद्यात वाढ होण्याची शक्यता आहे. मित्र-मैत्रिणींची भेट होईल. सरकारी कामं पूर्ण होतील.

मिथुन :- धार्मिकस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. व्यवसाय आणि नोकरीत पदोन्नती होईल. लव लाईफ चांगली राहील. अतिरिक्त खर्च टाळा. घरात मौल्यवान इलेक्ट्रोनिक वस्तूंची खरेदी होईल. मुलांची अभ्यासात छान प्रगती होईल. त्यामुळे घरात चांगले वातावरण राहील. जोडीदाराला कामकाजात साथ द्या.

कर्क :- मीडिया आणि आय.टी. क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश मिळेल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. कदाचित परदेश प्रवासही घडेल. पण त्यामुळे घसघशीत आर्थिक लाभ होईल. आपल्या जोडीदाराला विश्वासात घ्या. म्हणजे मनःस्थिती सकारात्मक राहील. 

सिंह :- प्रलंबित कामं पूर्ण होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहील. बाहेर फिरायला जाऊ शकता. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. बरेच दिवस रखडलेली कामे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पूर्ण कराल. त्यामुळे मनाला समाधान लाभेल.प्रलोभने टाळावेत. 

कन्या :- आय.टी. आणि बॅंकिंग क्षेत्रातील लोकांना नवनवीन संधी उपलब्ध होईल. आरोग्य निरोगी राहील. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण असेल.छोटासा प्रवास घडेल. त्यामुळे छान बदल अनुभवाल. वादविवादाचे प्रसंग टाळा. वाणीवर संयम ठेवा. खर्चाचे पत्रक गृहलक्ष्मीच्या हाती सोपवा. अबोली रंग परिधान करा.

तूळ :- अचानक धनलाभ होईल. त्यामुळे सगळ्या आर्थिक विवंचना दूर होतील. घरात आनंदाचे वातावरण असेल.व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. आरोग्याची काळजी घ्या. आपल्या किमती वस्तू जपून ठेवा. हातून काहीतरी सर्जनशील घडेल. 

वृश्चिक :- आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून चांगलं सहकार्य मिळेल. कठिण परिश्रम केल्यानंतर तुमच्या कार्यात यश येईल.क्रीडा, राजकारण अशा क्षेत्रांत प्रगती करण्याची संधी प्राप्त होईल. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल.

धनु :- घरात नवीन कार्यक्रमाची योजना कराल. आरोग्याची काळजी घ्या. मित्र-मैत्रिणींच्या भेटीमुळे तुमचे मन प्रसन्न होईल. आपल्या बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. कोर्टाच्या कामांना गती मिळेल. प्रकृतीमान ठीक असले तरी उष्णतेच्या विकाराबाबत जागरूक राहावे. आर्थिक बाजू ठीक राहील. कामात पारदर्शकता ठेवा

मकर :- कुटुंबातील व्यक्तींकडून चांगली बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. वायफळ खर्च करणं टाळा.आर्थिक बाजू सावरता येईल. आप्तेष्टांशी सामंजस्याने वागणे हितकारक राहील. नव्या उद्योगाला चालना मिळेल. आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. 

कुंभ :- राजकीय क्षेत्रात यशप्राप्त होईल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. कामात आपले कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त होईल. आर्थिक बाजू सावरता येईल. आपला अनुभव व प्रयत्न यांची योग्य सांगड घातल्याने नियोजित गोष्टी प्राप्त करणे शक्य होऊ शकेल. 

मीन :- आर्थिक लाभ होईल. धार्मिकस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मनाप्रमाणे वस्तूंची खरेदी कराल. स्थावरबाबत जागरूक राहा.प्रकृतीमान ठीक राहील. कामकाजात सावधानता बाळगावी. वादाचे लहान-सहान प्रसंग कटाक्षाने टाळा.

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close