सोसायटीच्या सचिवाविरूध्द अपहाराचा गुन्हा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर : सोसायटीच्या सभासदांनी कर्ज हप्ता म्हणून भरलेले २ लाख ८७ हजार ३९ रुपयांची रक्कम संचालक मंडळाची परवानगी न घेता जेऊर सोसायटीच्या सचिवाने संचालक मंडळाची परवानगी न घेता या रकमेचा गैरवापर केला आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सचिव अजय बाळाजी पाटोळे (रा. जेऊर ता.नगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अतुल अरविंद शुक्ल (वय- ४८ रा. पंचवटी पाईपलाईन, सावेडी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले की,१ एप्रिल २०१७ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत पाटोळे हा विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवपदी कार्यरत होता.

त्याने याकाळावधीत सोसायटीच्या सभासदांनी कर्ज हप्ता म्हणून भरलेली २ लाख ८७ हजार ३९ रुपयांची रक्कम संचालक मंडळाची मंजुरी नसताना खर्च नावे दाखवली.

इमारत बांधकाम व कर्मचारी पगार देण्यात आल्याचे दाखवून पदाचा गैरवापर करत अपहार केला. असे शुक्ल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Leave a Comment