Ahmednagar NewsAhmednagar NorthBreaking

बांधावरील झाडाच्या वादातून तिघांना बेदम मारहाण करत ठार मारण्याची धमकी

नेवासा – शेवगाव तालुक्यातील गुंफा गावच्या शिवारात शेताच्या सामाईक बांधावरील झाडाच्या कारणावरुन तिघांना लोखंडीगज, लाकडी दांडके व दगडाने बेदम मारहाण करून जबर जखमी केले. शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
यात शेतकरी गोरक्षनाथ दशरथ नजन, सत्यभामा गोरक्षनाथ नजन, व्यंकटेश गोरक्षनाथ नजन हे  जखमी झाले आहेत.

याप्रकरणी,  शेतकरी गोरक्षनाथ दशरथ नजन यांच्या फिर्यादीवरुन आरोपी अर्जुन दशरथ नजन, ताराबाई अर्जुन नजन, अशोक अर्जुन नजन, अनिता अशोक नजन, सर्व रा. गुंफा, ता. शेवगाव. व इतर पाच आरोपी यांच्याविरुद्ध शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button