दिल्लीतून राजीनाम्याचे निर्देश

नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे निर्देश दिल्लीतून आल्याची सूत्रांची माहिती आहे. महाराष्ट्रातील सत्तानाट्यात भाजपाची सूत्रे हलविणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तत्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली.

Loading...

न्यायालयाने फडणवीस सरकारला बुधवारी विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे जाण्यास सांगितले होते. तसेच विश्वासदर्शक ठरावावर गुप्तऐवजी उघड मतदान घेण्यात यावे आणि त्याचे थेट प्रक्षेपण करण्याचे निर्देश दिले.

न्यायालयाच्या या आदेशावर मोदी-शहा यांच्या बैठकीत मंथन झाले. यानंतर अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.