BreakingMaharashtra

अखेर फडणवीसांच ‘वर्षा’वरचं बिऱ्हाड हलवलं…!

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने हे पद घेतलं नव्हतं. मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी ही प्रथा मोडून एक नवा इतिहास रचला आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मंत्र्यांना आपले बंगले रिकामे करावे लागले होते. पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम आणखी तीन महिने वर्षा बंगल्यातच राहील असं त्यावेळी सांगण्यात आल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.
सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना बंगला खाली करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. मात्र 23 नोव्हेंबरला रातोरात राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आणि राज्यातील सत्तासमीकरणे बदलली.

या शपथविधीसाठी देशभरात निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. एकीकडे ही लगबग सुरु असताना, तिकडे वर्षा बंगल्यावर मावळत्या मुख्यमंत्र्यांची आवरा आवर सुरु झाली आहे.
 ‘वर्षा’ निवासस्थानी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस  यांचं घरगुती साहित्य घेऊन जाण्यासाठी टेम्पो आला आहे. जवळपास 12 लोक साहित्य पॅक करण्यासाठी आले आहेत.

आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असल्याने, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान म्हणून ओळख असलेला वर्षा बंगला आता त्यांना मिळणार आहे. त्यामुळे मावळत्या मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगला खाली करावा लागत आहे.

गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरही वर्षा बंगला सोडण्याबाबतचे विनोद व्हायरल होत होते. अखेर आता देवेंद्र फडणवीसांना आवराआवर सुरु केली आहे.

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close