घरात घुसलेल्या चोरट्यांचा प्रतिकार केल्याने चोरट्यांनी केला कुऱ्हाडीने हल्ला

amc adv
श्रीगोंदे – घराचा दरवाजा तोडून घरात घुसलेल्या चोरांवर प्रतिकार केल्याने चोरट्यांनी डोक्यात कुर्हाडीचा जबरी घाव घालून जखमी केले. ही घटना श्रीगोंदा परिसरात मांडवगण रोड, तरटे वस्ती, शाडूचा मळा येथे घडली.
सविस्तर माहिती अशी की,  भगवान तरटे यांच्या बंगल्यात रात्री १. ४५ च्या सुमारास तोंडाला फडके गुंडाळलेले चोरटे घराचा दरवाजा तोडून घरात घुसले. घरात सामानाची उचकापाचक करत असताना घरातील लोकांना जाग आली.
त्यांच्यावर  धोंडिबा यशवंत तरटे, रा. तरटे वस्ती, शाडू मळा, श्रीगोंदा यांनी प्रतिकार केला. तेव्हा एका चोरट्याने कुर्हाडीने डोक्यात वार करुन धोंडिबा तरटे यांना जबर जखमी केले.
Loading...
याप्रकरणी बबन रभाजी रोडे यांनी श्रीगोंदा पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन तोंड बांधलेल्या अज्ञात तिघा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरटे प्रतिकार केल्याने मारहाण करुन ऐवज न घेताच पळून गेले. घटनास्थळी पोनिजाधव, सपोनि सानप यांनी भेट दिली. आरोपींचा श्रीगोंदा पोलीस कसून शोध घेत आहेत. जखमी इसमावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.