कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
शिरसगाव – देणेदारांना आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शिरसगाव येथील अण्णासाहेब अर्जुन दौंड या ३८ वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. 
विशेष म्हणजे मुंबईला बहिणीकडे निघून राहुरीत उतरुन या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविली. त्यामुळे खळबळ उडाली असून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या अवस्थेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, अण्णासाहेब दौड हे शिरसगाव येथील रहिवासी आहेत. यांना शिरसगाव परिसरात ३ ते ४ एकर जिरायती शेती आहे.
त्यांच्यावर शेतीच्या नापिकीमळे आणि अवकाळी पावसामुळे कर्जाचा डोंगर वाढलेला होता. काल रात्री चिंताग्रस्त अवस्थेत असणाऱ्या दौंड यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबईला बहिणीकडे जाण्यासाठी श्रीरामपूर येथून एसटीबसमध्ये बसून दिले.
सर्वांचा निरोप घेवून अण्णासाहेब दौंड हे मुंबईला बहिणीकडे निघाले मात्र मध्येच राहुरी येथे बसस्टॅण्डवर ते उतरले. त्यानंतर रात्री, पहाटे आलम शेख नावाच्या व्यक्तीने राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला असणाऱ्या एका छोट्याशा बोळीत दौंड यांना बेशुद्धावस्थेत पडलेले पाहिले.
त्यानंतर आलम शेख यांनी माणुसकी धर्मातून तातडीने इतरांना ही बाब सांगून दौंड यांना रुग्णालयात नेले. मात्र विषारी औषध प्राशन केलेले असल्याने अण्णासाहेब दौंड यांचा त्यात मृत्यू झाला.
याची माहिती आज सकाळी शिरसगावात कळाली. सरपंच आबासाहेब गवारे हे आपल्या सहकाऱ्यांबरोबर राहुरी येथे घटनास्थळी पोहोचले.
त्यानंतर या ठिकाणी शवविच्छेदन होवून दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात येणार होता, याबाबत राहुरी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

Leave a Comment