सहा हजाराची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यास झाली इतक्या वर्षाची शिक्षा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संगमनेर :- जमिनीच्या हद्द मोजणीची कागदपत्रे तहसील कार्यालयात पाठविण्यासाठी सहा हजारांची लाच घेणाऱ्या दौलत नामदेव डामरे यांना चार वर्षांची साधी कैद व २४ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवली

या खटल्याची सुनावणी संगमनेर न्यायालयामध्ये सुरू होती.दौलत डामरे हे ऑक्टोबर २०१० मध्ये अकोले येथील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कार्यरत होते.

या वेळी एका व्यक्तीकडून जमिनीची हद्द कायम मोजणीची कागदपत्रे तहसील कार्यालयात पाठवण्यासाठी त्यांनी सहा हजार रुपयांची लाच मागितली होती.

दि. २९ ऑक्टोबर २०१० रोजी लाचेची रक्कम स्वीकारताना डामरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक विजय धोपावकर यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून संगमनेर येथील विशेष न्यायालयात ११ मार्च २०११ ला दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्याची सुनावणी आता पूर्ण झाली असून न्यायालयाने डामरे याला ४ वर्षांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. डामरे याला २४ हजार रुपयांचा दंडही करण्यात आला आहे.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी पाहिले. त्यांना पोलिस हेडकॉन्स्टेबल सतीश जोशी यांनी सहकार्य केले.

Entertainment News Updates 

Leave a Comment