अजित पवारांना भाजप प्रवेशाची ऑफर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांना भाजप प्रवेशाची ऑफर आलीय जर उपमुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर त्यांनी भाजपसोबत यावं.

आपण मिळून सरकार चालवू, असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

अजित पवारांनी अभ्यास न करता भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपला सरकार स्थापन करता आले नाही. जर हे सरकार चाललं नाही तर पुन्हा भाजप सरकार स्थापन करु शकते.

त्यामुळे अजित पवारांनी भाजपला पुन्हा पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तर त्यांनी अभ्यास करुन यावे, असंही ते म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीचं सरकार चालेल. शिवसेवा पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असंही आठवले म्हणाले आहेत. 

Leave a Comment