महापौरांच्या प्रभागातच मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट ! 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर : प्रभाग क्र. १ मधील सिद्धिविनायक कॉलनीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, एका श्­वानास मागील काही महिन्यांपासून त्वचेचा विकार व जखमा झाल्या आहेत.

या श्­वानामुळे आरोग्याचा प्रश्­न ऐरणीवर येऊन नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. महापौरांच्या प्रभागातील सदर प्रश्­न त्यांना सांगून देखील उपाययोजना होत नसल्याचे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सिद्धिविनायक कॉलनीत एका श्­वानाला काही महिन्यांपासून त्वचेचा विकार होऊन जखमा झाल्या आहेत. यामुळे सदर श्­वान घराच्या परिसरात आला असता त्याची मोठी दुर्गंधी पसरत आहे.

तो या घरातून त्या घरापुढे वारंवार बसत असताना, या श्­वानाचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक व लतिका पवार यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे केली होती. मात्र महापालिकेकडून याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.

Leave a Comment