Breaking

आरोपींनीच केली स्कुटी पंक्चर,ट्रकमागे केला बलात्कार प्रियंका रेड्डी हत्याप्रकारणाबाबत धक्कादायक माहिती समोर !

वृत्तसंस्था :- हैदराबादमध्ये प्रियंका रेड्डी या 26 वर्षीय डॉक्टरवर बलात्कार करून या तरुणीला जाळून मारण्यात आले आहे. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे.

या  हत्येप्रकरणी साईराबाद पोलिसांनी ट्रक ड्रायव्हर सहित क्लीनर अशा चार लोकांना ताब्यात घेतले आहे. मोहम्मद पाशा नावाचा मुख्य  संशयित आरोपी सुद्धा पकडला गेला आहे. पाशा हा महबूबनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर त्यांना पकडण्यात आले आहे. 
त्या दिवशी नेमक काय झाल ???

प्रियंका शादनगर येथील आपल्या घरातून शम्शाबाद स्थित कोल्लूर गावातील एका पशू चिकित्सालयात (वेटरनरी रुग्णालय) नोकरीसाठी निघाली होती. हैदराबादमधील सरकारी पशू वैद्यकीय रुग्णालयात काम करत होती. प्रियंका नेहमीप्रमाणे तिचं रुग्णालयातलं आपलं काम संपवून घरी निघाली होती. रस्त्यात तिची गाडी पंक्चर झाली.  

त्यानंतर तिला एका व्यक्तिने गॅरेजपर्यंत लिफ्ट दिली. गॅरेजजवळ खूप ट्रक ड्रायव्हर्स होते. तिने बहिणीला फोन केला आणि बहिणीला सांगितले की, “काही लोकांनी तिची गाडी ताब्यात घेतली आहे. आम्ही पंक्चर काढून देऊ चल असं तिला म्हणत आहेत, मला टेन्शन आलंय..”

एवढं बोलून होईपर्यंत तिचा फोन कट झाला.फोन कट झाल्यामुळे तिची बहीण घाबरली. तिने आणि तिच्या काही नातेवाईकांनी तिची शोधाशोध सुरु केली. ती कुठेच सापडली नाही आणि दुसऱ्या दिवशी तिचा पूर्णपणे जळलेला मृतदेह मिळाला….

गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू

पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पीडित तरुणीने आराडाओरडा केला असता तिचा आवाज कोणालाही ऐकायला जाऊ नये यासाठी आरोपींनी तिचं तोंड दाबून ठेवलं होतं. श्वास घेऊ न शकल्यामुळेच गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला.

7 तास प्रियंकाला बांधून ठेवत बलात्कार !

प्रियंका रेड्डी हत्याप्रकरणी पोस्ट मार्टम अहवालातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, 4 जणांनी प्रियंकावर सामूहिक बलात्कार केला, त्यावेळी जवळपास 7 तास प्रियंकाला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत प्रियंकावर अत्याचार करण्यात आले. या चौघांनी प्रियंकाला टॉर्चर केल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.

आरोपींनी केली होती स्कुटी पंचर
पोलिसांना संशय आहे की ज्यांनी प्रियंका चा खून केला त्यांनीच स्कुटी पंक्चर केली होती. त्यानंतर मदत करण्याच्या बहाण्याने त्यांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला टोल गेट येथे नेऊन ट्रकच्या मागे तिच्यावर बलात्कार केला

ट्रक मध्ये टाकून पुलावर नेला मृतदेह !
त्यानंतर तिथेच तिचा खून करण्यात आला. त्यानंतर तिचा मृतदेह एका ट्रक मध्ये टाकून पुलावर घेऊन गेले  आणि त्याच वेळी तिची स्कुटी रस्त्याच्या कडेला सोडून देण्यात आली
दूधवाल्या ने पाहिला प्रियंकाचा जळणारा मृतदेह !
प्रियंकाचा मृतदेह सर्वप्रथम सत्यम नामक एका दूधवाल्या ने पाहिला. त्यांनी सांगितले की गुरुवारी सकाळी पाच वाजता तो त्याच्या गाडीवरून शेतात जात होता त्याच वेळी पुलाच्या खाली काहीतरी जळताना त्याला दिसले त्याला आधी वाटले की थंडीपासून बचाव करण्यासाठी कुणीतरी शेकोटी पेटवली असावी, मात्र माघारी येताना त्याला राखेमध्ये हात दिसला यानंतर घाबरलेल्या सत्यमे ने पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलावले. 
ओळख फक्त तिच्या स्कार्फ आणि लॉकेटवरुन पटली
प्रियंकाचा मृतदेह इतक्या जास्त प्रमाणात जाळाला होता की तिचे घरचे सुद्धा तिला ओळखू शकत नव्हते नराधमांनी प्रियांकाचा मृतदेह इतक्या वाईट पद्धतीने जाळला की तिची ओळख फक्त तिच्या स्कार्फ आणि लॉकेटवरुन पटली.
मुलीच्या हत्यारांना जिवंत जाळले पाहिजे.

पोलिसांनी पाशा समवेत नवीन, केशव उलु आणि शिवा या तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रियंकाच्या आईने सांगितले की माझ्या निर्दोष मुलीच्या हत्यारांना जिवंत जाळले पाहिजे. त्यांनी असेही सांगितले की, या घटनेनंतर जेव्हा माझी लहान मुलगी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आली तेव्हा कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी तिला शमशाबाद येथे पाठविले. तिला असे सांगण्यात आले की हा गुन्हा त्यांच्या क्षेत्रात घडला नसल्यामुळे ते येथे गुन्हा दाखल करून घेऊ शकत नाही.  
घटनेविरोधात देशभरातून संताप
या घटनेनंतर प्रियंका चे सर्व कुटुंबीय अत्यंत शोकाकुल वातावरणात आहेत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी ते करत आहेत. या घटनेविरोधात देशभरातून संताप व्यक्त होतोय. जंगली प्राण्यांनाही लाज वाटेल असे हे कृत्य आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया दाक्षिणात्य कलाकारांनी दिली आहे.

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close