झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात ६२.८% मतदान ; नक्षल्यांनी पूल उडवला 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रांची : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तुरळक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. ६ जिल्ह्यांमध्ये १३ जागांसाठी ६२.८७ टक्के मतदान झाले.

हे मतदारसंघ अत्यंत संवेदनशील असल्याने सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत मतदानाची वेळ होती. दरम्यान, अतिरिक्त पोलिस महासंचालक मुरारी लाल मीणा यांनी सांगितले की, नक्षल्यांनी गुमला जिल्ह्यात विष्णुपूर भागात एक पूल स्फोटकांनी उडवला.

यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. नक्षल्यांच्या या कारवाईमुळे मतदानावर कोणताही परिणाम झाला नाही. दुसरीकडे पलामूतील डाल्टनगंजमध्ये भाजप व काँग्रेस उमेदवारांच्या समर्थकांत हाणामारी झाली.

काँग्रेसने या ठिकाणी बुथ कॅप्चरिंगचा आरोप केला. पहिल्या टप्प्यात १५ महिलांसह १८९ उमेदवार या मतदारसंघांत मैदानात आहेत. २३ डिसेंबरला निकाल जाहीर होईल.

Leave a Comment