घटस्फोट झाला असेल तर अकाली मृत्यू येऊ शकतो !

वॉशिंग्टन : घटस्फोटानंतर लोकामध्ये धूम्रपान करण्याची वा व्यायामाला पुरेसा वेळ न देण्याची प्रवृत्ती बळावण्याची शक्यता वाढते. धूम्रपान व आणि व्यायामाचा अभाव या दोन्ही गोष्टी अकाली मृत्यूसाठी कारणीभूत ठरतात. एका नव्या अध्ययनातून हे समोर आले आहे. 
शास्त्रज्ञांनी घटस्फोटाचा संबंध खराब आरोग्यासोबत जोडला असून त्यात वेळेआधीच मृत्यूच्या जास्त जोखमीचा संबंध आहे. अर्थात घटस्फोट व खराब आरोग्य यांच्यातील संबंधांचे कारण आतापर्यंत फार चांगल्या प्रकारे लक्षात येऊ शकलेले नाही.
Loading...
अमेरिकेतील ॲरिजोना विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केले असून त्यात घटस्फोटानंतर धूम्रपानाची शक्यता वाढणे आणि शारीरिक कसरतींचे घटणारे प्रमाण या दोन्ही संभाव्य गोष्टी अधोरिखित करण्यात आल्या आहेत.
ॲरिजोना विद्यापीठातील मानसशास्त्राचे तज्ज्ञ आणि जर्नल एनल्स ऑफ बिहेवियोरल मेडिसिनचे प्रमुख लेखिका कॅली बौरासा यांनी सांगितले की, वैवाहिक स्थिती आणि अकाली मृत्यूचा एकमेकांसोबत संबंध असल्याच्या पुराव्यांतील फरक जाणून घेण्याचा या अध्ययनाचा मुख्य उद्देश होता. वैवाहिक स्थिती मानसशास्त्रीय आाणि शारीरिक आरोग्य दोन्हींशी संबंधित आहे.