फरार आरोपीस सापळा रचुन शिताफीने पकडले! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर : न्यायालयाने फरारी घोषित केलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सुनिल राजेंद्र पालवे (वय २९, रा.मेहेकरी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोठला परिसरात सापळा रचुन शिताफीने पकडले. 

सुनिल पालवे याच्याविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यात न्यायालयाने त्यास जामीनावर सोडले होते. जामीनावर सुटल्यानंतर कोर्ट कामाकरीता सुनील पालवे हा न्यायालयात हजर झाला नाही.
त्यामुळे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नं.३ यांनी सीआरपीसी ८२ प्रमाणे जाहिरनामा काढून त्यास फरार म्हणून घोषित केले होते. फरार आरोपी हा पोलिसांना मिळून येत नव्हता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सुनिल पालवे हा कोठला परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.
Loading...
त्यानुसार पोलिसांनी कोठला परिसरात सापळा रचुन त्याला शिताफीने अटक केली व पुढील कारवाईकामी नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले.
ही कारवाई पो.नि. दिलीप पवार यांच्या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पो. ना.मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, पो. ना.रविंद्र कर्डिले, भागिनाथ पंचमुख, योगेश सातपुते, चालक हेकॉ. बबन बेरड यांनी केली आहे.