श्रीगोंद्यात माजी सरपंचाचा अपघातात मृत्यू

श्रीगोंदा :- काष्टीचे माजी सरपंच, विद्यमान सदस्य असलेले शिवनेरी उद्योग समुहाचे अध्यक्ष पोपटराव विलासराव माने यांचे अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघाती निधन झाले. ते ३५ वर्षांचे होते.

एक डिसेंबरला रात्री दहा वाजता माने आपल्या शिवनेरी हॉटेलचे कामकाज संपवून समोरच असलेल्या घरी जात असताना रस्ता ओलांडताना दौंडकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाची त्यांना जोराची धडक बसली.

Loading...

माने गंभीर जखमी झाले. त्यांना येथील तरुणांनी लगेचच रूग्णालयात दाखल केले. डोक्याला व हातपायांना मोठ्या जखमा झाल्याने त्यांना दौड येथे नेण्याचे ठरले.

वाटेतच त्यांचे निधन झाले. घोडनदीतिरी अंत्यसंस्कार करण्यात आले. माने हे आमदार बबनराव पाचपुते व जि. प. सदस्य सदाशिव पाचपुते यांचे विश्वासू कार्यकर्ते होते.

पाच वर्षे त्यांनी सरपंच म्हणून काम पाहिले. त्यांच्यामागे आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.