संगमनेरचे ‘ राजहंस ‘ बाळासाहेब थोरात यांच्या खेळीने काँग्रेसला अच्छे दिन !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहणारे व संगमनेरचे ‘ राजहंस ‘ समजले जाणारे ज्येष्ट नेते काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संयमी खेळीने काँग्रेसला पुन्हाअच्छे दिन आले आहेत.

आमचा नेता बाळासाहेब थोरात गडी लयीच जोरात असे सांगत काँग्रेसच्या कार्यकर्ते आनंद साजरे करीत असून सेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या सत्तास्थापणेमुळे थोरात यांच्यामुळे जिल्ह्याला झळाळी मिळाली आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये मातब्बर राजकारण्यांपुढे राज्यातील नेतृत्वही अनेकदा झुकले आहे. गेल्या ४ ते ५ वर्षांपासून काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात भाजपने आपले पाय रोवले. 
माजी मंत्री राधाकृष्ण विखे, मधुकर पिचड, प्रा . राम शिंदे , बिपीन कोल्हे, शिवाजीराव कर्डिले , बबनराव पाचपुते या मातब्बर नेत्यांनी भाजपला पाठबळ देण्याचा निर्णय घेतला. अशा वेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यापुढे गंभीर पेच निर्माण झाला होता.
जिल्ह्यात विरोधकांनी बाळासाहेब थोरात यांना घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु सतत शांत व संयमी राहून आपली चाणाक्ष खेळी खेळत जिंकण्यात माहिर असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी जिल्ह्यातच नव्हे राज्यात आपली विजयी मुहूर्तमेढ रोवली.
राज्यात काँग्रेस पक्ष खिळखिळी झालेली असताना सर्वच मोठे नेते पक्ष सोडून भाजपमध्ये डेरेदाखल होत होते . अशा वेळी बाळासाहेब थोरात यांनी तरूण संघटनेवर भर दिली . मित्र पक्ष राष्ट्रवादी पक्षासोबत राहून इतर मित्र पक्षांनाही न्याय दिला. अहंकार न बाळगणाऱ्या बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्याच्या भुमिकेमुळे तरूण उमेदवारांच्या गळ्यातील ताईत बनले. 
तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नजरेतही बाळासाहेब थोरात यांनी मोलाचे स्थान मिळविले . काँग्रेसचे देशातील नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल यांच्यासाठी बाळासाहेब थोरात यांचे मत हेच महाराष्ट्राचे मत असे मानले जाऊ लागले आहे. 
जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या दुरदृष्टी व नेतृत्वगुणामुळे १२ – ० ची भाषा करणाऱ्यांची चांगलीच गोची झाल्याचे दिसून आले आहे.काँग्रेस पक्षाची विचारधारा हेच सर्वस्व मानत सदैव पक्षाशी एकनिष्ठता राखणारे बाळासाहेब थोरात यांच्या एकवचनी कारभारामुळे विरोधकही त्यांचे मुरीद झालेले आहे.
राज्यात सत्तास्थापण होण्यामागे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे मोलाचे योगदान राहिलेले आहे . यामुळे नगर जिल्ह्यामध्ये थोरातांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्याने जिल्ह्याचे पारणे फिटले आहे. 
अहमदनगर जिल्ह्यामध्ये भविष्यात थोरात यांच्या रूपाने पहिले उपमुख्यमंत्री लाभण्याची दाट शक्यता आहे. सदरचे पद मिळाल्यास जिल्ह्याला झळाळी प्राप्त होऊन अनेक प्रश्नांची सोडवणूक होण्यास मदत होणार आहे. यामुळे राज्यात स्थापण होणाऱ्या सत्तेत महत्वाची भूमिका बजाविणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे जिल्ह्याचे सर्व सुत्रे जाणार आहेत.

Leave a Comment