Best Sellers in Electronics
BreakingLifestyle

अचानक USB Condom ची मागणी वाढण्याचं हे आहे कारण

USB Condom हे नाव ऐकूनच तुम्हाला हादरा बसला असेल . पण, हे  नवं प्रोडक्ट सध्या मार्केट मध्ये  धुमाकूळ घालताना दिसत आहे.  तुमची कोणतीही गोष्ट ‘लीक’ होणार नाही याची काळजी USB Condom (डेटा ब्लॉकर) घेते. 

अचानक USB Condom (डेटा ब्लॉकर) ची मागणी वाढत आहे.  एखाद्याच्या खासगी जीवनाशी घेणं-देणं आहे.
दिसायला अत्यंत साधं आणि आकारनं लहान असलेलं हे उपकरण जवळपास 500 रुपयांमध्ये ऑनलाइन तुम्हाला मिळू शकते. यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय PortaPow USB डेटा ब्लॉकर (USB Condom) आहे. याला कोणत्याही युएसबी डेटा केबलशी कनेक्ट करता येतं.
त्यानंतर पब्लिक युएसबी चार्जिंग स्टेशनच्या डिव्हाइसशी कनेक्ट केल्यास कोणत्याही प्रकारचा डेटा ट्रांसफर करता येत नाही. सोप्या शब्दांमध्ये सांगायचं तर हे डिव्हाइस युएसबी केबलला साध्या चार्जिंग केबलमध्ये रुपांतरीत करतं, ज्याद्वारे डेटा ट्रांसफर करता येत नाही.

पण चार्जिंग मात्र सुरू राहतं. सार्वजनिक ठिकाणी चार्जिंगसाठी पोहोचलेल्या युजरने चार्जिंग स्टेशनमध्ये युएसबी केबलद्वारे डिव्हाइस चार्जिंगसाठी लावताच त्यामध्ये व्हायरसचा शिरकाव होतो. परिणामी युजर्सचा पर्सनल डेटा, पासवर्ड्स चोरी केले जातात.
यामुळेच USB चार्जिंग स्कॅमच्या वाढत्या प्रकारांमुळे ‘USB कंडोम’ आता आवश्यक बनलं आहे. स्कॅमर्स किंवा हॅकर्स आपले युएसबी केबल मुद्दाम चार्जिंग स्टेशनवर ठेवून जातात आणि अन्य युजर त्या केबल थेट आपल्या डिव्हाइसमध्ये प्लग करतात.
तर काही प्रकरणांमध्ये डिव्हाइस पूर्णतः लॉक होतो आणि स्कॅमर स्वतः डिव्हाइस अनलोक करण्यासाठी किंवा मदतीसाठी पुढे सरसावतात. त्याबदल्यात ते युजरकडे पैशांची मागणी करतात. यामुळेच युएसबी डेटा ब्लॉकर किंवा सोप्या शब्दात ‘USB condom’ जवळ असणं आवश्यक झालं आहे.
परिणामी सतत फिरतीवर असणाऱ्यांमध्ये अर्थात ट्रॅव्हलर्समध्ये या छोट्या डिव्हाइबाबत प्रचंड क्रेझ पाहायला मिळतंय.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button