बसमध्ये तरुणीचा विनयभंग

नगर : नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात पवारवाडी घाट हॉटेल आशीर्वाद समोर हमसफर ट्रॅव्हल्स बस क्र. एमएच २० डीडी ६०६ ही प्रवासी पाण्याकरिता थांबली असता सदर बसमधील काही प्रवासी चहापाणी पिण्यास गेले व काहीप्रवासी झोपलेले होते.
 त्यात एका सिटवर २३ वर्षाची औरंगाबादची तरुणी झोपलेली होती.
Loading...
या संधीचा फायदा उठवत बसमध्ये असलेला आरोपी बालाजी दत्तू दहिभाते, रा.समुद्रवाणी, जि. उस्मानाबाद याने सदर तरुणीजवळ जावून तिला धरुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन विनयभंग केला.
तरुणीने जोरदार प्रतिकार केला. थेट सुपा पोलिसात जावून तरुणीने फिर्याद दिली.
आरोपी बालाजी दत्तू दहिभाते याच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी बालाजी दहिभातेला अटक केली आहे.