राधाकृष्ण विखे पाटील,बबनराव पाचपुते यांच्यासह हे आमदार भाजप सोडणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकी पूर्वी मेगा भरती करून घेणाऱ्या भाजपला आता धक्का बसण्याची शक्यता आहे आता याच मेगाभरतीचं भाजपवर बुमरँग होण्याची शक्यता निर्माण झाली असून भाजपचे तब्बल 12 विद्यमान आमदार आणि एक खासदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. 

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आता त्याचे हादरे भाजपला बसू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यामुळे पक्षांतर करून फसलेले आमदार पुन्हा आता सत्ताधारी पक्षाच्या संपर्कात आहेत.याबाबतचे वृत्त साम मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे. 

भाजपने अनपेक्षितरित्या राज्यातील सत्ता गमवल्यानंतर आता पक्षात बरीच धुसफूस सुरु असल्याचं दिसून आलं आहे. भाजपचे डझनभर आमदार व एक खासदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजप सत्तेत असल्यामुळे आणि फडणवीस सरकार पुन्हा सत्तेत येईल, असं वातावरण भासल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे ढिगभर नेते आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये सहभागी झाले होते मात्र आता थेट विरोधात बसावं लागल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे.

त्यामुळे यापैकी अनेक आमदार आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने घरवापसीच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. आता हे पुन्हा आपल्या मूळ पक्षात परतण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. यासाठी ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्यासही तयार असल्याचं बोलण्यात येत आहे.

हिवाळी अधिवेशनानंतर आमदारांच्या माघारी फिरण्याला जोर येण्याची चिन्हं आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक पसंती राष्ट्रवादी पक्षाला आहे. तर काही जणांनी शिवसेना आणि काँग्रेसला पसंती दिली असल्याचेही बोलले जात आहे. 

हे आमदार भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत 

बबनराव पाचपुते
राणा जगजितसिंह पाटील
नमिता मुंदडा
जयकुमार गोरे
कालिदास कोळंबकर
राधाकृष्ण विखे पाटील
नितेश राणे
काशिराम पावरा
रवीशेठ पाटील

या आगोदर शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील अनेक नेते भाजपात येणार असे म्हंटले होते. जेव्हा विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक आमदारांना सरकारी निर्णयांचा फटका बसला होता. यापैकी अनेक आमदार हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधील शिक्षण सम्राट तसेच साखर कारखाना श्रेत्राशी संबंधित होते.

दरम्यान जर हे नेते जर महाविकास आघाडीत परतले तर मोठा फटका भाजपला बसेल. त्यामुळे भाजप राज्यात बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढण्याची तयारी असलेल्या आमदारांविषयी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेतृत्वाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. भाजपचा नाराज राज्यसभा खासदार कोण, अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.

 

Leave a Comment