जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामाऱ्या

अकोले :- तालुक्यातील कोतूळ येथे जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीतून अकोले पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

याबाबत अकोले पोलिसांत गेणू धोंडिबा भुजबळ (वय ८६) यांनी दिलीप काशिनाथ भुजबळ, प्रविण काशिनाथ भुजबळ, आशिष सुनील भुजबळ, विजय भाऊसाहेब मंडलिक, सखुबाई काशिनाथ भुजबळ, दुर्गा सुनील भुजबळ, सुनील गेणू भुजबळ (रा. कोतूळ),

रत्नप्रभा भाऊसाहेब मंडलिक (रा.उंचखडक) अशांनी संगनमत करून वाईटसाईट शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करत तक्रारकर्ते यांचा नातू नवनाथ काशिनाथ भुजबळ यास आरोपी प्रविण भुजबळ याने

AMC Advt

त्याच्या हातातील कोयत्याने डाव्या हाताचे दंडावर मारून जखमी केले व शेतातील पिकाचे नुकसान केले. या तक्रारीवरून अकोले पोलिसांनी आरोपींविरद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शकुंतला काशिनाथ भुजबळ (वय ६५) यांनी आरोपी नवनाथ काशिनाथ भुजबळ, वैशाली नवनाथ भुजबळ, बेबी बाळासाहेब ढोले, गेणू धोंडिबा भुजबळ (सर्व रा.कोतूळ) यांनी

तक्रारकर्ती घरात काम करीत असताना घरात घुसून प्रांताधिकारी संगमनेर यांच्याकडे आमच्याविरूद्ध अपिल करून आमच्याविरूद्ध निकाल का लावून घेतला, असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून धमकी दिली. यावरून अकोले पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.