बाळासाहेब थोरात म्हणाले, पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात संधी देणार पण…..!

अहमदनगर – विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता.

मात्र, आता भाजपची सत्ता गेल्यावर हेच नेते पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या बातम्या रंगू लागल्या आहेत.याच मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि नवनिर्वाचित मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे.

ते म्हणाले,  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांतून इतर पक्षांत गेलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्याच्या संदर्भातील निर्णय नव – युवक कार्यकर्त्यांना विचारुनच घेण्यात येईल. असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.

AMC Advt

विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षाला गळती लागली असताना सामान्य कार्यकर्त्यानी पक्षाशी एकनिष्ठ राहून लढा दिला त्यामुळे मतदारसंघातील जे नव युवक कार्यकर्ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे होते.

त्यांना विचारूनच बंडखोरांना पक्षात घ्यायचं की नाही हे ठरवलं जाणार आहे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र विकास आघाडीचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांपैकी काही नेते पुन्हा विधानसभा निवडणूक जिंकले तर काहींना पक्षांतर केल्याचा फटका बसला आहे. त्याताच भाजपची राज्यातील सत्ता गेली आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांच्या महाराष्ट्र विकास आघाडीने राज्यात सत्ता स्थापन केली.