भरदिवसा अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला ५ च्या सुमारास भरदिवसा तिच्या रहात्या घराजवळून अज्ञात आरोपीने फूस लावून पळवून नेले. 

याप्रकरणी मुलीच्या आईने संगमनेर तालुका पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने पालक वर्गात खळबळ उडाली आहे.

मुलीचा व आरोपीचा हे.कॉ. औटी हे शोध घेत आहेत. सततच्या घडणाऱ्या घटनांमुळे पालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment