पत्नीचा साडी धरुन विनयभंग, तर पतीला पट्ट्याने मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी!

शिर्डी – राहाता शहरात पिंपळवाडी रोड भागात राहणारे एका २८ वर्ष वयाच्या विवाहित तरुणीचा मागील भांडणाच्या कारणावरुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन साडी धरुन विनयभंग केला. 

तसेच तरुणीस व तिच्या पतीस लाथाबुक्क्याने व पट्ट्याने मारहाण करून शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

पिडीत विवाहित तरुणीने राहाता पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन नातेवाईक असलेले आरोपी अक्षय राजू पगारे, रा. आंबेडकरनगर, राहाता,

AMC Advt

आकाश बाळू गायकवाड , ऋषिकेश किरण अमोलिक दोघे रा. रांजणगाव रोड, राहाता या तिघाविरुद्ध विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला.