Ahmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreaking

जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींसाठी 9 जानेवारीला मतदान

अहमदनगर: राज्यातील विविध 8 जिल्ह्यांमधील 34 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 9 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 9 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. 

यात नगर जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याठिकाणी थेट जनतेतून सरपंचांची निवड होणार असल्याने चुरस पहायला मिळणार आहे.
संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे 19 ते 24 डिसेंबर 2019 या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 26 डिसेंबर 2019 रोजी होईल.

नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबर 2019 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 9 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 10 जानेवारी 2020 रोजी होईल.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button