वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 सुपा : पारनेर तालुक्यातील पुणे – नगर महामार्गावर सुपा शिवारातील हॉटेल शिवनेरी समोर दि.२ रोजी १२ वाजेचे सुमारास अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगईने व अविचाराने भरधाव वेगात चालवून एका अंदाजे ५० वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषास पाठीमागून जोराची धडक दिली.

यात त्या अनोळखी व्यक्तीस गंभीर दुखापतीस व मृत्यूस कारणीभूत होवून अपघाताची खबर न देता व मदत न करता पळून गेला.

याबाबत अज्ञात वाहनचालकाविरूध्द सुपा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून , अपघाताचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार सुनिल कुटे करीत आहेत.

Leave a Comment