शेतीच्या बांधावरून लाकडी दांड्याने आणि कुन्हाडीने मारहाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिर्डी :  कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात राहणाऱ्या शेतकरी महिला मिराबाई उत्तम देवकर यांच्या शेताच्या सामाईक बांधावर शेजारील आरोपींनी बांधावरील शेत नांगरताना मोडल्याने मिराबाई देवकर या आरोपींना समजावून सांगत असताना त्यांना पाच आरोपींनी लाकडी दांड्याने व कुन्हाडीने मारहाण केली.

मुलगा सोमनाथ उत्तम देवकर हा सोडविण्यासाठी आला असता त्याला पण बेदम मारहाण केली.

मिराबाई उत्तम देवकर या शेतकरी महिलेने कोपरगाव तालुका पोलिसात फिर्याद दिल्यावरुन मारहाण करणारे आरोपी सुदाम पांडुरंग देवकर, गणेश सुदाम देवकर,

मंगेश सुदाम देवकर, सुभद्राबाई सुदाम देवकर, सुवर्णा गणेश देवकर, सर्व रा. धारणगाव शिवार, कोपरगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment