Ahmednagar NewsAhmednagar SouthBreaking

ताब्यात घेतलेले जेसीबी, डंपर तस्करांनी पळवले

पारनेर : गौण खनिजाची चोरी केल्याप्रकरणी जापनीज हबमध्ये ताब्यात घेतलेले दोन जेसीबी व एक डंपर कंपनीचा पत्रा तोडून मध्यरात्री कारवाई सुरू असतानाच पळवून नेण्यात आला.

एक पोकलेन पळवून नेण्याचा प्रयत्न पथकाने हाणून पाडला. मायडीया, कॅरीअर व मिंडा या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उभारणीचे काम सुरज बिल्डकॉन व ईसीआर या नामांकित बांधकाम कंपन्यांकडे आहे.

या कंपन्यांनी गौण खनिजाचा पुरवठा करण्याचा करार स्थानिक ठेकेदारांशी केला आहे. या कंपन्यांनी सुरज व ईसीआर यांना उभारणीचे काम देताना केंंद्र तसेच राज्य शासनाच्या आवश्यक परवानग्या, शासनाचे कर, स्वामीत्व धन संबंधितांनी जमा करण्याचा करार केला आहे.

ठेकेदाराने नेमलेल्या उपठेकेदारांनी मात्र शासनाचे नियम, शासनास भरावयाचे स्वामीत्वधन यास हरताळ फासून लगतच्या गावांमधील शासकीय, तसेच खासगी जमिनींमधून मुरूमाचे बेकायदा उत्खनन करून ते कंपन्यांच्या हवाली केले.

वाळू, खडी, सॅन्ड क्रशचा जो पुरवठा करण्यात आला आहे, त्याचेही स्वामीत्व धन शासनाकडे जमा करण्यात आले नसल्याचे कारवाईत उघड झाले.

त्याच्या नोंदवह्या एकाही कंपनीत आढळल्या नाहीत. तहसीलदार ज्योती देवरे यांच्या पथकाने कारवाई केल्यानंतर ती टाळण्यासाठी प्रयत्न केले गेले.

मात्र, देवरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. तिन्ही कंपन्यांमध्ये गौण खनिज आढळल्याने रात्रभर कारवाई सुरू होती.

पथक जेवणासाठी बाजूला गेल्यावर ईसीआर कंपनीच्या ठेकेदाराकडील दोन जेसीबी, तसेच एक डंपर पत्रा तोडून पळवून नेण्याचे धाडस करण्यात आले.

याप्रकरणी तहसीलदार देवरे यांनी सुप्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसलेे यांना अहवाल पाठवला असून संबंधितांची वाहने महसूल विभागाकडे जमा करण्यास सांगण्यात आले.

मध्यरात्री दोनच्या सुमारास विपुल सावंत हा तस्कर मींडा कंपनीत पोहोचला. तेथून पोकलेन पळवून नेण्याचा त्याचा प्रयत्न होता, मात्र पथकाने त्यास मज्जाव केला.

ताब्यात घेतलेली यंत्रे, वाहने तहसील कार्यालयात आणण्यात येत होती. नादुरुस्त वाहने ताबा पावती करण्यात येऊन कंपनी व्यवस्थापनाकडे स्थानबद्ध करण्यात आल्याचे तहसीलदार देवरे यांनी सांगितले.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button