Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingMaharashtra

मुलीस फूस लावून पळवून नेत बलात्कार करणारा आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला,पण…

श्रीरामपूर :- येथील ग्रामीण रुग्णालयात वैैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांना गुंगारा देऊन धूम ठोकली. रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारत आरोपी पसार झाला.

राहुल गणेश शिंदे (वय २०) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. एक वाजेच्या दरम्यान तो बेड्यांसह पसार झाला.मात्र पोलिसांनी त्याला पाच तासात पुन्हा अटक केली.

तिघा पोलीस कर्मचा-यांनी त्याला वैैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. तपासणी झाल्यानंतर पोलिसांना गुंगारा देत मुख्य प्रवेशद्वारातून त्याने रुग्णालयाच्या मागील बाजूने भिंतीवरून उडी मारत पळ काढला.

यावेळी पोलिसांसमवेत रुग्णालय कर्मचारीही त्याच्या मागे पळाले. पण तो काही पोलिसांच्या हाती लागला नाही.

श्रीरामपूर शहरातील खिलारी वस्ती भागात नुकताच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेतील तो आरोपी आहे.

त्याच्यावर प्रारंभी मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला. त्यानंतर बलात्काराचाही गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांच्याकडे आहे. त्यांना याबाबत विचारणा केली असता आरोपी पळाल्याच्या घटनेला त्यांनी दुजोरा दिला.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button