Entertainment

अभिनेत्री केतकी माटेगावकर बद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत ?

सोज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने केतकी माटेगावकरने मराठी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलंय. टाईमपास, काकस्पर्श, तानी सिनेमात झळकली आहे.अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिका ही आहे.

ती एक उत्तम गायिका ही आहे. केतकी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती स्वतःचे फोटो शेअर करत असते. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे केतकी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

केतकी माटेगावकर यांना ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या झी मराठी वरील कार्यक्रमामुळे प्रसिद्धी मिळाली. शाळा या मराठी चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीस सुरुवात केली. ‘आरोही‘, ‘काकस्पर्श‘, ‘तानी‘, ‘टाईमपास‘ या चित्रपटांतहि केतकी माटेगावकर यांनी काम केले आहे.

केतकी माटेगावकर यांना त्यांच्या काकस्पर्श या मराठी चित्रपटातील भूमिकेबद्दल, मराठी इंटरनॅशनल फिल्म ॲन्ड थिएटरचा २०१२ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

केतकी माटेगावकर या एक मराठी अभिनेत्री व गायिका आहेत. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांच्या गाण्यांचा पहिला आल्बम निघाला. केतकी यांची आई सुवर्णा माटेगावकर या प्रख्यात गायिका आहेत तसेच केतकी चे वडील उत्तम हर्मोनियम वादक आहेत यामुळे घरातुनच संगीताचे संस्कार तिच्यावर झाले.

केतकी माटेगावकरचा जन्म २२ फेब्रुवारी १९९४ रोजी नागपुरात झाला,सुंदर लोभस चेहऱ्याची, गोड गळ्याची इनोसंट लुक असणारी हि तारका आज मराठी सिनेसृष्टीतील भावी सुपर स्टार म्हणून पाहिली जात आहे.

केतकीने २०१२ मध्ये शाळा या मिलिंद बोकील यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपटात मुख्य भूमिका केली. मिलिंद बोकिलांची अतिशय गाजलेली ही कादंबरी असल्याने त्यावरील हा चित्रपट ही तुफान गाजला. शाळकरी विद्यार्थ्यांच्या समस्या व त्यांच्यात त्या पौगंडावस्थेत होणारे शारीरिक व मानसिक बदल हा या चित्रपटाचा विषय. वयात एणारी मुलं आणि त्यांच्या मनात उमलणार्या नाजूक भावना अतिशय हळुवार पणे या चित्रपटात चित्रित झाल्या आहेत .

या पाठोपाठ केतकी आरोही… गोष्ट तिघांची या चित्रपटात मृणाल कुलकर्णी व किरण करमरकर या कलाकारांसमवेत रुपेरी पडद्यावर झळकली. हा एक कौटुंबिक सामाजिक चित्रपट होता. यात केतकीने एका बाल गायिकेची भूमिका केली होती. एका कुटुंबावर आलेल्या कठीण प्रसंगात त्या कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात.

त्यानंतरचा तानी हा चित्रपट सर्वस्वी केताकीचाच चित्रपट होता. एका निम्न वर्गातील हुशार मुलगी विपरीत परिस्थितीत ही आपले शिक्षण पूर्ण करते व कलेक्टर च्या पदावर पोहोचते, या कथानकात केतकीच्या भूमिकेला शाळकरी मुलीपासून ते कलेक्टर झालेल्या तरुणीची अशी अनेक रूप दाखवायची संधी मिळाली व तिने तिचे सोने केले.

यानंतरचा महेश मांजरेकर यांच्या काकस्पर्ष या चित्रपटात केतकीने नायिकेच्या …प्रिया बापट  हिच्या लहानपणीची भूमिका रंगवली आहे. या चित्रपटाचा काळ साधारणपणे विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा आहे त्यामुळे त्य्काल्ची वेशभूषा आणि त्याकाळचे एकूण राहणीमान दर्शवणारया या चित्रपटात इतर कलाकारांसोबत केतकी नऊ वार साडीत फारच सुंदर दिसली आहे. अभिनयाच्या दृष्टीने ही हा चित्रपट केताकीसाठी फारच महत्वपूर्ण ठरला आहे.

२०१४ मध्ये आलेला टाईमपास केतकीचा सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. यात तिच्या सोबत आहे प्रथमेश परब हा नवोदित कलाकार. किशोरवयातील प्रेम कथा हे कथानक असलेला हा चित्रपट प्रेमात पडलेल्या किशोरवयातील मुला मुलीं विषयी सांगतो. अल्लड प्रेमाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला.

 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button