सावधान! मुंबईच्या पाण्यात चक्क भलामोठा व्हायरस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : मुंबईतील तलावांमध्ये ‘हल्ला करणारा अमिबा’ म्हणजेच ‘महाकाय व्हायरस’ मुंबईतील तलावात सापडला आहे. मुंबईच्या पाण्यात चक्क भलामोठा व्हायरस आढळून आलाय.

या जलाशयांमधील असंख्य भल्या मोठ्या विषाणूंनी बनवलेली ‘प्रथिने’ पाहून संशोधकही अवाक् झाले आहेत. ते विषाणू कोणावरही विसंबून न राहता स्वत:च प्रथिनांची निर्मिती करतात, असेही अभ्यासात निदर्शनास आले.

पवई येथील ‘आयआयटी बॉम्बे’ या संस्थेमधील संशोधक प्रा. किरण कोंडाबागील आणि त्यांच्या गटाने केलेल्या संशोधनानंतर मुंबईतील जलाशयांमध्ये ‘महाकाय’ विषाणूंचे अस्तित्व असल्याची नोंद केली आहे.

वास्तविक विषाणू हे सर्वात लहान आणि अत्यंत प्राचीन प्राणी असून, पृथ्वीवरील जवळजवळ सर्वत्र व माती, झाडे, पाणी आणि प्राण्यांमध्येही आढळतो. एखाद्यावेळेस ते इतर सूक्ष्म जंतूंमध्येदेखील जसे की बॅक्टेरिया आणि बुरशीमध्येही आढळतात.

जरी अनेक विषाणूंमुळे मानवाला आजार उद्भवतात; परंतु इंग्लंडमध्ये सापडलेल्यांपैकी बरेच विषाणू माणसासाठी निरुपद्रवी आहेत, असेही सिद्ध झाले आहे.

सर्व सजीवांप्रमाणेच, विषाणूंमध्येदेखील ‘जनुके’ असतात. त्यातून आवश्यक ती प्रथिने बनवून ते मनुष्य जीवन टिकवण्यासाठी महत्त्वाची असून, विषाणूंचे आकार विभिन्न असतात. तथापि, ‘राक्षस’ विषाणूंचा ‘जीनोम’ आकार हा काही दशलक्ष इतका भव्य असतो, तर काही ‘राक्षस विषाणू’ हे बॅक्टेरियांपेक्षा मोठे असतात.

वैज्ञानिकांना महासागर, तलाव, वनजाती आणि मानवी आतडे अशा विविध वातावरणातही ‘महाकाय व्हायरस’ आढळले आहेत, असा अंदाज आहे. मात्र, हे विषाणू ‘इको सिस्टीम’ राखण्यासाठी योगदान देतात.

 

अभिनेत्री केतकी माटेगावकर बद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत ?

Leave a Comment