पोलिओ निर्मूलन मोहिमेसाठी जाणाऱ्या स्वयंसेवी कार्यकर्तीची हत्या

amc adv

पेशावर: पाकिस्तानमध्ये पोलिओ निर्मूलन मोहिमेसाठी जाणाऱ्या एका स्वयंसेवी कार्यकर्तीची हत्या करण्यात आली. मुलांना पोलिओ डोस देण्यासाठी जात असताना तिच्या वाहनावर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला.

या गोळीबारात बिस्ताज बीबी नामक ही महिला मृत्युमुखी पडली, तर तिचा चालक जखमी झाला. हल्लेखोर पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पाकमध्ये पोलिओ निर्मूलन मोहिमेच्या कार्यकर्त्यांवर हल्ल्याच्या घटना नेहमीच घडतात.

पोलिओ निर्मूलन मोहिमेच्या नावाखाली लोकसंख्यावाढीवर नियंत्रण मिळवण्यात येत असल्याचा आरोप करत कट्टरवादी, दहशतवादी संघटना या मोहिमेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करतात.