भाजपच्या तब्बल २१ नेत्यांवर महिला अत्याचाराचे गुन्हे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या तब्बल २१ कायदे मंडळ सदस्यांवर महिला अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचा दावा ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ने (एडीआर) आपल्या एका अहवालात केला आहे.

याविषयी काँग्रेस दुसऱ्या (१६), तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस पक्ष तिसऱ्या (७) क्रमांकावर आहे. ‘२००९ मध्ये लोकसभेतील २ सदस्यांवर महिला अत्याचाराशी संबंधित गुन्हे दाखल होते. २०१९ मध्ये हा आकडा वाढून १९ वर पोहोचला आहे’, असे ‘एडीआर’ने म्हटले आहे.

आतापर्यंत ३ खासदार व ६ आमदारांनी आपल्यावर बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे घोषित केले आहे. गत ५ वर्षांत मान्यताप्राप्त पक्षांनी असे गुन्हे दाखल असलेल्या तब्बल ४१ उमेदवारांना आपली उमेदवारी दिली आहे.

‘एडीआर’च्या मते, मागील ५ वर्षांत भाजपने महिलांशी संबंधित गुन्हे दाखल असणाऱ्या ६६ उमेदवारांना लोकसभा, राज्यसभा व विधानसभेची उमेदवारी दिली. त्या तुलनेत काँग्रेसने अशा ४६; तर बसपने ४० उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले.

‘एडीआर’ व ‘राष्ट्रीय निवडणूक वॉच’ने विद्यमान ७५९ खासदार व ४०६३ आमदारांनी दाखल केलेल्या ४८९६ निवडणूक प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करून हा दावा केला आहे. ‘या कालावधीत असे गुन्हे दाखल असणाऱ्या लोकसभेतील खासदारांचा आकडा २३१ पटीने वाढून ३८ वरून १२६ वर पोहोचला’, असेही या संघटनांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगालच्या सर्वाधिक खासदार व आमदारांनी (१६) आपल्यावर महिलांशी संबंधित गुन्हे दाखल असल्याचे घोषित केले आहे. तद्नंतर ओडिशा व महाराष्ट्राचा क्रमांक आहे. या दोन्ही राज्यांच्या प्रत्येकी १२ आमदार व खासदारांनी अशा प्रकारची घोषणा केली आहे.

अभिनेत्री केतकी माटेगावकर बद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत ?

Leave a Comment