अहमदनगरच्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संगमनेर :- कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचा करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निळवंडे (ता. संगमनेर) येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे, काँग्रेस सेवादलाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष कचरू पवार यांनी केली आहे.

मुंबई येथील मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच विधानसभेचे सभापती नाना पटोले यांची भेट घेत सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे तसेच काँग्रेस सेवादलाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष कचरू पवार यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, असे साकडे घातले.

कामगार नेते मोहन तिवारी यावेळी उपस्थित होते. संपूर्ण कर्जमाफी प्रश्नी दिलेल्या निवेदन त्यांनी म्हटले की, राज्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपविली.

शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणे गरजेचे आहे. नव्या सरकारकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी केली आहे.

Leave a Comment