हे आहेत भारतातील चार मोस्ट वॉन्टेड अतिरेकी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- वर्ष 2019 मध्ये अनेक मोस्ट वॉंटेड अतिरेकी भारतातील सुरक्षा एजन्सीजच्या हिटलिस्टवर होते. यावेळी जेव्हा संसदेमध्ये युएपीएची पहिली लिस्ट जाहीर केली गेली तेव्हा त्यामध्ये भारतातील टॉप चार मोस्ट वॉंटेड अतिरेक्यांची नावे होती. ज्यांनी भारताला सर्वात जास्त नुकसान पोहोचवले आहे. हे चार अतिरेकी आहेत मसूद अजहर, हाफिज सईद, जकी उर रहमान लखवी आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम. या चौघांनीही भारतासहित देशभरातील अनेक देशांना त्रस्त करून सोडले आहे.
मसूद अजहर
मसूद अजहर सध्या पाकिस्तानस्थित बहावलपूर आणि कराची येथे राहतो. मसुद अजहरने अफगाणिस्तान मध्ये अमेरिका आणि नाटोच्या विरोधात जैश ए मोहम्मद चा मुख्य म्हणून लढाई केली होती. 2001 मध्ये झालेल्या संसदेवरील हल्ल्यांमध्ये याचा सहभाग होता. 2008 च्या मुंबईवरील हल्ल्यात आणि 2016चा पठाणकोट हल्ल्यात सुद्धा मसुदचा सहभाग होता 2019च्या पुलवामा हल्ल्यामध्ये सुद्धा अजहरची मुख्य भूमिका होती संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि अमेरिकेने सुद्धा त्याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी म्हणून घोषित केले आहे.
हाफिज मोहम्मद सईद
हाफिज सईद चा पत्ता आहे जोहर टाऊन लाहोर मात्र तो सध्या जेलमध्ये आहे. हाफीज सईद पाकिस्तानातील संघटना जमात उल दवाचा मुख्य आहे. हाफिज सईद 2001च्या दिल्ली मधील संसदेवरील हल्ल्यांमध्ये सामील होता तर 2006 च्या मुंबई लोकल ट्रेन मधील बॉम्बस्फोटात सुद्धा तोच होता 2008 च्या मुंबई हल्ल्यातील हल्ल्यामध्ये सुद्धा मास्टरमाइंड हाफिज सईद होता.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम
भारतामध्ये जन्मलेला दाऊद इब्राहिम सध्या क्लिफ्टोन रोड कराची येथे राहतो. दाऊद इब्राहिमला डी कंपनीचा मुख्य म्हणून ओळखले जाते. दाऊदने 1993 मध्ये झालेला मुंबई बॉम्ब ब्लास्ट घडवून आणला होता. तो भारतामध्ये स्मगलिंग चे काम करायचा त्याच्याविरोधात मुंबईमध्ये मर्डर आणि वसुलीचे सुद्धा अनेक खटले आहेत.
जकी उर रहमान लखवी
भारताच्या टॉप 4 अतिरेक्‍यांमध्ये जकी उर रहमान लखवी याचा समावेश होतो. त्याने लष्कर-ए-तोयबाचा सुप्रीम कमांडर म्हणून 2006 साली झालेल्या मुंबई रेल्वे बॉम्बब्लास्टमध्ये असलेल्या फियादिनिंना ट्रेनिंग दिली होती. त्याचबरोबर 2008ला मुंबईवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्‍यांनी सुद्धा त्यानेच ट्रेनिंग दिले होते.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment