आता अहमदनगरचे बसस्थानकही गेले खड्ड्यात !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- कायम वर्दळीचे आणि गजबजलेले स्थानक म्हणून माळीवाडा बसस्थानकाची ओळख आहे. मात्र स्थानकाच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे दिसते.

मध्यवर्ती ठिकाण असल्याने दररोज शेकडो बसगाड्यांची आणि हजारो प्रवाशांची ये-जा सुरू असते. अलीकडेच झालेल्या पावसाचा जसा शहरातील रस्त्यांना फटका बसला, तसाच तो बसस्थानकांनाही बसला आहे.

डांबरीकरण आणि सिमेंटचे ब्लॉक बसविण्यात आलेले असले, तरी ते उखडले असून खड्ड्यांमुळे प्रवाशांना धक्के आणि धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.

बसस्थानकातील अंतर्गत रस्ते खड्ड्यात गेले असून येथे कचऱ्याचे साम्राज्य असल्याने दुर्गंधी पसरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली बसस्थानकाच्या सुशोभीकरणाची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही.

बसस्थानक व आजूबाजूच्या रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले असूनरस्त्यांची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण बसस्थानकच खड्ड्यात गेले आहे. याचा त्रास प्रवासी, नागरिक व विद्यार्थ्यांना होत आहे. 

खड्डेमय रस्त्यांवरून स्थानकात आल्यावर तरी बस स्थिरस्थावर होईल, अशी अपेक्षा असताना तेथील खड्ड्यांचे धक्के सुरूच असतात. काही ठिकाणी धूळही झाली आहे.

गाड्यांमुळे ही धूळ उडत असल्याने बससोबतच स्थानकातील इतर प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागतो.

बस फलाटावर लागेपर्यंत एखाद्या खड्ड्यात हमखास आदळते, तेव्हा प्रवाशांना पाठीचा मणका मोडल्याचा भास होतो. बसमार्गावरील फलाटापर्यंत खड्डे आवाराची शोभा व सौंदर्याला काळिमा फासतात.

बसस्थानकात  ठिकठिकाणी जमीन उखडून खड्डे पडले आहेत. आत येण्याचा मार्ग आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर जोरदार धक्का बसल्याशिवाय बस पुढे जाऊच शकत नाही.

एसटीने मोठी खर्च करून स्थानकांत सुधारणा केल्या असल्या, तरी आता त्यांची पुन्ही दुरवस्था झाल्याने दुरूस्तीची वेळ आली आहे.

शौचालयातील दुर्गंधी व आवारात पसरलेली घाण प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्‍यात असल्याची जाणीव करतात.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment