पराभूत भाजप आमदारांच्या तालुक्यातील कार्यकर्ते सैरभर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीचे बिगूल वाजले असून सध्या शहराध्यक्ष व ग्रामीण जिल्हाध्यक्षाच्या निवडणुकीसाठी भाजपने संघटना निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.

या निवडणुकीसाठी भाजप प्रदेशने खासदार गिरीश बापट यांची नगर जिल्हा निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या आदेशाने भाजपचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण प्राध्यापक भानुदास बेरड यांनी जिल्ह्याच्या १४ मतदारसंघात भाजपच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

डिसेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार असून भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीचे बिगुल वाजले असले, तरी गेल्या अडीच वर्षांपूर्वीचा उत्साह मात्र यंदाच्या संघटनात्मक निवडणुकीत दिसून येत नाही.

पक्षाच्या विद्यमान चार आमदारांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याने त्या-त्या मतदारसंघांमध्ये या निवडणुकीला कार्यकर्त्यांनी गांभीर्याने घेतलेले नसून नेता पराभूत झाल्याबरोबरच राज्यातूनही सत्त्तेतून बाहेर गेल्याने कार्यकर्ते सैरभर आहेत.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment