शिर्डीतील वेश्या व्यवसाय संदर्भात गांभीर्याने विचार करायला हवा – आ.राधाकृष्ण विखे 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी :- नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या पुण्यभूमीत जगभरातून लाखो भाविक येत असून त्यांना पॉलीसी वाल्यांकडून होणार्‍या त्रासापासून मोकळा श्वास मिळावा यासाठी दि. 23 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत शहरातील सर्व पॉलिसीवाले बंद करण्यात यावेत, असा निर्णय आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी ग्रामस्थांच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.

रविवार दि. 22 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी ग्रामस्थांची बैठक पार पडली. 

वेश्या व्यवसाय संदर्भात गांभीर्याने विचार

सध्या शहरात वेश्या व्यवसाय संदर्भात गांभीर्याने विचार करायला पाहिजे. यामध्ये पोलिस प्रशासन आणि नगरपंचायत त्यांचे कर्तव्य पार पाडत आहे. प्रत्येक महिन्याला ग्रामस्थांची बैठक घेण्यात यावी, असे सूतोवाच आ. विखे यांनी केले. 

सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना

यावेळी अधिकार्‍यांना आ. विखे यांनी सूचना केल्या. यावेळी शिर्डी शहरातील संभाव्य गर्दी लक्षात घेता वाहतुकीवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली असून आ. विखे यांनी महामार्गावर निमगाव बाह्यवळण ठिकाणी सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना केल्या. तसेच त्या ठिकाणी विविध भाषेतील फलक लावण्यात यावे. या फलकावर नियमांचे उल्लंघन केल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल. 

…तर शिर्डीकरांचे अपयश  

वाहतूक पोलिसांनी स्वागत कमानीजवळ वाहने तपासावी, असे सांगून शहरात येणारा साईभक्त हा आसपासच्या शहरात राहणे पसंत करीत असल्याचे सांगत हे शिर्डीकरांचे अपयश असल्याचे त्यांनी सांगितले. 

अल्पवयीन मुला-मुलींना रुम देऊ

हाँटेल व्यावसायिकांनी अल्पवयीन मुला-मुलींना रुम देऊ नये. यामध्ये हाँटेल व्यवसायिकांची काही जबाबदारी आहे. नुसतेच पोलीस प्रशासनाला दोष देण्यात काय अर्थ, असे सांगून शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी एक वेबसाईट तयार करावी स्टार कॅटेगिरीचा अवलंब केल्यास हॉटेलमध्ये सुसूत्रता येईल.

यावेळी साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, शिर्डीचे मुख्याधिकारी सतीश दिघे, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, ज्येष्ठ नेते हिरामण वारुळे, गणेशचे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, संचालक मधुकर कोते, तज्ञ संचालक राम कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, नितीन कोते, नगरसेवक शिवाजी गोंदकर, जगन्नाथ गोंदकर,

सुजित गोंदकर, हरिश्चंद्र कोते, ताराचंद कोते, साईबाबा एम्प्लॉईज सोसायटीचे नूतन अध्यक्ष यादवराव कोते, भाजपचे रवींद्र गोंदकर, दिनकर कोते, अरविंद कोते, राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष रमेश गोंदकर, उत्तम कोते, बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल शेजवळ, श्याम कोते, विकास गोंदकर, गजानन शेर्वेकर, सचिन शिंदे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment