Ahmednagar NewsAhmednagar NorthBreaking

पती-पत्नी पुलावरून खाली पडल्याने गंभीर जखमी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव:  नगर-मनमाड महामार्गावरून दुचाकीने जात असताना समोरून आलेल्या वाहनाने हुलकावणी दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी पुलावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाली.

घटनेनंतर वाहनचालक फरार झाला आहे. रविवारी दुपारी सुरेगाव येथील भामाबाई राजेंद्र आसने (४०) व राजेंद्र कचरू आसने (४५) हे पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना जुनीगंगा देवी मंदिराजवळील पुलावर समोरून आलेल्या वाहनाने हुलकावणी दिल्याने ते तोल जाऊन दुचाकीसह पुलावरून पडले.

पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button