Ahmednagar CityAhmednagar News

अब की बार, थ्री स्टार : स्वच्छता सर्वेक्षणात नगरकरांनी सक्रिय सहभाग घ्यावा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- महानगरपालिकेने स्वच्छता सर्वेक्षण 2020 मध्ये सहभाग घेतलेला आहे. महापालिकेच्या वतीने स्वच्छता विषयक उपाययोजनांसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. यंदाच्या सर्वेक्षणात ‘थ्री स्टार’ मानांकन मिळविण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने नागरिकांच्या सहकार्यातून प्रयत्न सुरू आहेत.

उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, स्वच्छता सर्वेक्षणात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठीही प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असून, यंदाच्या सर्वेक्षणात अव्वल मानांकन मिळविण्यासाठी महापालिकेने ‘अब की बार, थ्री स्टार’चा नारा दिला आहे. स्वच्छता ही केवळ महापालिकेची, नगरसेवकांची व अधिकार्‍यांचीच जबाबदारी आहे, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.

सर्व नागरिकांच्या सहकार्याने ‘थ्री स्टार’चे उद्दिष्ट साध्य करायचे आहे. त्यामुळे स्वच्छतेबाबत कुणीही तडजोड करु नये. आपले शहर स्वच्छ असावे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्रयत्न केल्यास शहर स्वच्छ व सुंदर होऊ शकते. मात्र, याबाबत सकारात्मक मानसिकता नागरिकांनी तयार करावी आहे.

स्वच्छतेबाबत इंदोरचे उदाहरण संपूर्ण देशात दिले जाते. मात्र, इंदोरमध्ये प्रत्येक नागरिक स्वच्छता दूत म्हणून काम करत असल्याने तिथे हा बदल झालेला आहे. त्यानुसार नगर शहरातील प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेबाबत संकल्प करावा. स्वच्छतेबाबत आपल्या परिसरात कोणतीही तडजोड करु नये.

आपला परिसर शहरात सर्वोत्कृष्ट, सर्वात स्वच्छ असावा, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. स्वच्छतेबाबत नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर त्या कराव्यात. तक्रारींमुळे व त्यातून मिळणार्‍या माहितीमुळे नियोजन योग्य करता येईल. स्वच्छता रँकींगमध्ये सुधारणा केल्यास शहराला 11 कोटींचे पारितोषिक मिळणार आहे.

त्यामुळे ‘अब की बार, थ्री स्टार’चे उद्दिष्ट गाठायचे असा निर्धार आपण सर्वांनी करायचा आहे. महापालिकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी यासह नगरसेवक व सर्व पदाधिकारी, स्वच्छता दूत, कामगार युनियन यांनी एकत्रित येवून ‘अब की बार, थ्री स्टार’चे उद्दिष्ट साध्य करण्याचा संकल्प केलेला आहे.

नागरिकांनीही या स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे. रस्त्यावर इतरत्र कचरा न टाकता, तो घंटागाडीतच टाकावा. प्लॅस्टिक मुक्त शहरासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहनही महापालिकेच्या सर्व पदाधिकारी, नगरसेवक व अधिकार्‍यांनी नागरिकांना केले आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button