माजीमंत्री आ.विखे पाटलांची बदनामी करणा-यांवर गुन्‍हा दाखल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टिम / राहाता :- माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी कॉग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेवून कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्‍याबाबतचे वृत्‍त समाज माध्‍यमातुन प्रसारित केल्‍याच्‍या कारणाने संबधितांच्‍या विरोधात लोणी बुद्रूकचे सरपंच लक्ष्‍मण बनसोडे यांनी दिलेल्‍या तक्रारीवरुन लोणी पोलिस स्‍टेशनमध्‍ये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

 या संदर्भात दिलेल्‍या तक्रारीत लक्ष्‍मण बनसोडे यांनी म्‍हटले आहे की, माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या विरोधात काही वेबपोर्टल, व्टिटर आणि वृत्‍तपत्राच्‍या ऑनलाईन बातम्‍यांमध्‍ये बदनामीकारक व समाजामध्‍ये संभ्रम निर्माण करणारे वृत्‍त कोणताही संदर्भ व पुरावा नसताना केवळ सुत्र या आशयाने प्रसारीत करण्‍यात आले.

याबाबतची सत्‍यता जाणुन घेतल्‍यानंतरच आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांना केवळ बदनाम करण्‍याच्‍या कारणाने तसेच जनसामान्‍यांमध्‍ये त्‍यांची असलेली विश्‍वासार्हता कमी व्‍हावी या उद्देशाने सदरचा खोटा संदेश व बातमी प्रसिध्‍द केली याकडे लक्ष वेधण्‍यात आले आहे.

सदरचे वृत्‍त आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या अनेक चाहत्‍यांनी वाचले आहे. अशा सर्व वाचकांच्‍या मनामध्‍ये विखे पाटलांची प्रतिमा मलिन होवून बदनामी करण्‍याच्‍या कारणाने जाणीपुर्वक प्रसारित झालेले वृत्‍त देणा-यांची चौकशी करुन त्‍यांच्‍यावर कारवाई करावी अशी मागणी या अर्जात करण्‍यात आली आहे.सरपंच लक्ष्‍मण बनसोडे यांच्‍या तक्रारीवरुन लोणी पोलिसांनी दि.२८ डिसेंबर २०१९ रोजी ८४५/२०१९ अन्‍वये भारतीय दंडविधान कलम ५०० अन्‍वये गुन्‍हा दाखल केला आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment