धक्कादायक : कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थीनी प्रेग्नंट !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  सरकारी कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थीनी प्रेग्नंट असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय

हैदराबादमधील कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची नियमित वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. या वैद्यकीय तपासणीत कॉलेजमधील तीन विद्यार्थीनी गरोदर असल्याचं उघडकीस आलं आहे.

या कॉलेजच्या विद्यार्थीनींचं रूटीन चेकअप करण्यात आलं होत त्यांनतर तीन विद्यार्थीनी गरोदर असल्याचं उघड झालं.

या तिन्ही विद्यार्थीनींवर काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचार करण्यात आला असावा असा अंदाज जिल्हा बाल सुरक्षा अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

गरोदर असलेल्या तीन विद्यार्थीनींपैकी दोन विद्यार्थीनी या बीएससी फर्स्ट ईयरमध्ये शिक्षण घेत आहेत. तर तिसरी मुलगी बीएससीच्या सेकंड ईयरची विद्यार्थीनी आहे. या तिन्ही विद्यार्थीनींवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे.

 प्राथमिक तपासात या मुलींनी सांगितले की, त्यांचया घराजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीने त्यांचे लैंगिक शोषण केलं आहे. कॉलेज प्रशासनाने अद्याप आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केलेली नाहीये. 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment