या कारणामुळे झाला त्या तरुणाचा पोटात चाकू भोसकून खून…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;-  एका तरुणाच्या पोटात चाकू भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. नगर तालुक्यातील निंबळक बायपास येथे चाकूने भोसकून तरुणाचा खून करण्यात आला आहे.

नवनाथ गोरख वलवे ( वय ३२, राहणार सारोळा कासार, ता. नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा तरुण व्यवसायाने ट्रकचा चालक होता.

लामखेडे पेट्रोल पंपाच्या एक कि.मी. पुढे वळण रस्त्यावर मंगळवारी पहाटे झाला ट्रक ड्रायव्हरचा खून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. 

रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये ट्रक ड्रायव्हरचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. त्याच्या पाकिटात असलेल्या कागदपत्रांवरून मयताची ओळख पटली.

घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मोहन बोरसे व पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा ते शोध घेत आहेत. ट्रकमधून दुधाची पावडर नेली जात होती. त्यामध्ये मोठ्या किंमतीचा माल होता.

या व्यवसायामधूनच त्याचा खून झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुधाची पावडर पुरवठा करण्याचा वलवे यांचा व्यवसाय होता, अशीही माहिती आहे.

हे पण वाचा : जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शालिनी विखे यांची माघार

हे पण वाचा : वडीलांनी पाहिलेलं मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केल !

हे पण वाचा : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अजितदादांनी केला हा पराक्रम !

हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले …

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment