स्मार्टफोन व फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करण्यावर बंदी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- भारतीय नौदल कर्मचाऱ्यांना सेवेवर असताना स्मार्टफोन व फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करण्यावर बंदी घातली आहे.

सैनिकांमार्फत सोशल माध्यमातून शत्रूला माहिती दिल्या गेल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आहे.हा आदेश २७ डिसेंबर रोजी नवदलामार्फत जारी करण्यात आला.

शत्रुंना  माहिती पुरवल्याप्रकरणी २० डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुप्तचर विभागाने पाकिस्तानाशी संबंध ठेवणाऱ्या गुप्त रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

सोशल माध्यमावर बंदी घालण्यासह जहाजांवरदेखील स्मार्टफोन वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मंध्ये फेसबुक, वॉट्सअप, इंस्टाग्राम, मेसेजिंग ऍप आदींवर बंदी घालण्यात आली आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment