Breaking

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघातात दोन तरुण जागेवर ठार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- औरंगाबाद जिल्ह्यात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघातात दोन तरुण जागेवर ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

हे वाचा :- स्मार्टफोन व फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करण्यावर बंदी !

थर्टीफस्टची पार्टी करुन घरी जाताना बुधवारी मध्यरात्री 2 वाजता दौलताबाद किल्ल्यासमोर भीषण अपघात झाला आहे. कार विहिरीत पडून दोन ठार तर 3 जखमी झाले आहेत. 

हे वाचा :- अहमदनगर जिल्हापरिषदेत महाविकास आघाडीची सत्ता !

मिळालेली माहिती अशी की, नवीन वर्षाचे स्वागत करुन घरी परतताना झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दौलताबाद किल्ल्यासमोर मध्यरात्री ही घटना घडली.

हे वाचा :- कॉल गर्ल गँगच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

या अपघातात कार विहिरीत कोसळली. यामध्ये दोन ठार तर 3 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. सौरभ नांदापूरकर (वय-29, रा.रा रोकडे हनुमान कॉलनी), विरभास कस्तुरे (वय-34, रा.पुंडलिक नगर) असे दोन्ही मृत मुलांची नावे आहेत.

हे वाचा :- अहमदनगर च्या राजकारणाबाबत आमदार रोहित पवारांचे मोठे वक्तव्य

तर नितीन शिशीकर (वय- 34), प्रतिक कापडीया (वय-30), मधूर जयस्वाल (वय- 30) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button