India

कॉल गर्ल गँगच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, हॅपी एंडिंग’ कोड सांगितल्यावर मिळायच्या सेक्ससाठी मुली !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात पोलिसांनी एका स्पामध्ये सुरू असलेल्या कॉलगर्ल्सच्या गँगच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय.रॅकेट चालवल्याप्रकरणी पोलिसांनी 7 महिला आणि 5 ग्राहकांना अटक केली असून या स्पामध्ये सेक्स रॅकेट चालवले जात होते.

स्पामध्ये आलेल्या ग्राहकांनी जर हॅपी एंडिंग असा कोडवर्ड टाकला, तर त्या ग्राहकाला कॉलगर्लची सेवा दिली जात होती.भोपाळमधील बाग सेवनिया भागात असलेल्या शाइन स्पा सेंटरमध्ये कॉलगर्लना ग्राहकांसोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडले. या कारवाईत स्पा संचालकालाही अटक करण्यात आले आहे.

भोपाळ व्यतिरिक्त या स्पाचे नागपूर, नाशिक, मुंबई, जळगाव आणि इंदूरशी संबंध आहेत. मुलींना येथून भोपाळसह इतर ठिकाणी पाठविले जात असे आणि त्यांचा व्यापार सुरू होता.

या स्पामध्ये आलेल्या ग्राहकाने एकदा का हॅपी एंडिंग कोर्डवर्ड सांगितला की मग देह व्यापार करणारी तरुणी त्या ग्राहकाजवळ पाठवली जात होती. त्यानंतर तुम्हाला साधा मसाज करायचा आहे, की हॅपी एंडिग करायचे आहे, असे ग्राहकाला विचारले जात होते.

त्यानंतर साधा मसाज हवा असल्यास एक हजार रुपये, तर हॅपी एंडिंगसाठी ग्राहकाला ५० हजार रुपये द्यावे लागत होते.ग्राहकांना आधी त्यांच्या आवडीची मुलगी निवडण्यासाठी अल्बम दिला जायचा आणि मुलगी पसंत केल्यानंतर तिचा भाव निश्चित करण्यात येतो.

जे नियमित ग्राहक होते त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्येही ऑफर दिल्या जात ,त्या ग्रुपवरच त्यांना तरुणी निवडण्यासाठी त्यांचे फोटो दाखवले जात होते. तरुणीला निवडल्यानंतर मग किंमत ठरवली जात होती.

महाराष्ट्रातही असा व्यापार सुरू असल्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच खळबळ उडाली आहे. दरम्यान ज्या-ज्या ठिकाणी या स्पाचे कनेक्शन आहे त्या ठिकाणी पोलीस चौकशी करण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button