Maharashtra

छळास कंटाळून दीड वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- सासरच्या मंडळींकडून पैशासाठी सातत्याने होत असलेल्या छळास कंटाळून विवाहितेने केल्याची दुर्दैवी घटना बदनापूर तालुक्यात घडली आहे.

अवघ्या दीड वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बदनापूर तालुक्यातील आन्वी येथे घडली. स्वाती नानासाहेब ढाकणे व निखिल नानासाहेब ढाकणे अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि देऊळगावराजा तालुक्यातील असोला जहागीर येथील स्वाती ढाकणे हिचा आन्वीच्या नानासाहेब ढाकणे यांच्याशी विवाह झाला होता.

त्यांना लग्नानंतर मुलं झाली. मात्र मुलं रोगट आहे त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी माहेरहून पैसे आण असे म्हणत नवरा व सासरची मंडळी त्रास देत असायची 

याच छळास कंटाळून ३० डिसेंबर रोजी रात्री आपल्या दीड वर्षाच्या मुलासह स्वातीने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

जोपर्यंत स्वातीच्या सासरच्या मंडळींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाइकांनी घेतला.

नानासाहेब ढाकणे, अंकुश ढाकणे, अंजना ढाकणे, योगेश ढाकणे, अनिता कायंदे यांच्याविरुद्ध चंदनझिरा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button