Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar SouthBreakingMaharashtra

माजी महापौर संदीप भानुदास कोतकर याला जामीन मंजूर पण….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  ;- बहुचर्चित अशोक लांडे खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी महापौर संदीप भानुदास कोतकर याला केडगाव येथील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या दुहेरी हत्याकांडात जिल्हा न्यायालयाने आज शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती अ‍ॅड. महेश तलवे आणि अ‍ॅड. व्ही. आर. म्हस्के यांनी दिली.

हे पण वाचा :- वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले असे काही…

केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाचा कट रचल्याच्या संशयावरून माजी महापौर संदीप कोतकर याला सीआयडीने अटक केली होती. या गुन्ह्यात पोलीस कोठडीनंतर संदीप हा न्यायालयीन कोठडीत होता. जिल्हा न्यायालयात संदीप कोतकर याच्या जामीन अर्जावर गुरूवारी सुनावणी पूर्ण झाली.

हे पण वाचा :- या कारणामुळे प्राजक्त तनपुरे झाले मंत्री खुद्द शरद पवारांनीच दिले स्पष्टीकरण !

जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप यांच्यासमोर ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर संदीप कोतकर याला आज सशर्त जामीन मंजूर केला. एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्याबरोबरच जिल्हा बंदीचा अट आणि साक्षीदारांना न भेटण्याची अट जामिनात आहे.

हे पण वाचा :- राष्ट्रवादीचा हा नेता होणार अहमदनगरचा पालकमंत्री ?

जामीन मिळाल्यानंतर संदीप कोतकर याला अशोक लांडे खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षेसाठी कारागृहात रवाना व्हावे लागणार आहे. केडगाव येथील शिवसेनेचे संजय कोतकर व वसंत ठुबे या दोघांची ७ एप्रिल २०१८ रोजी राजकीय वादातून हत्या झाली होती.

हे पण वाचा :- आमदार निलेश लंके म्हणाले मंत्रिपदापेक्षा ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची !

संदीप कोतकर याचा या गुन्ह्यात सहभाग आढळल्यावर सीआयडीने त्याला या गुन्ह्यात १४ जानेवारी २०१९ रोजी गुन्ह्यात वर्ग केले. संदीप १६ जानेवारी २०१९ रोजी न्यायालयात हजर केले होते. तेव्हापासून संदीप या गुन्ह्यात सुरूवातीला पोलीस कोठडीत आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीत होता. या गुन्ह्यात संदीपची पत्नी सुवर्णा कोतकर अजून पसार आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अड्डाच्या पर्दाफाश

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button